image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
 
 
Awareness and Training Materials

पेशंट डायरी

Charter of Patients Rights and Responsibilities

   

सार्वजनिक आरोग्यसेवांचे ‘विकेंद्रित – लोकसहभागी’ नियोजन - जाणीव जागृतीसाठी सादरीकरण

सार्वजनिक आरोग्यसेवांचे ‘विकेंद्रित – लोकसहभागी’ नियोजन मार्गदर्शक पुस्तिका (2nd Edition)

Calendar 2017 - Community Action for Health in Maharashtra

सार्वजनिक आरोग्यसेवांचे ‘विकेंद्रित–लोकसह्भागी नियोजन’-मार्गदर्शक पुस्तिका

रुग्ण कल्याण निधीचे लोकाधारित
अंकेक्षण व नियोजन

मोडयुल 1-आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार


मोडयुल 2-आरोग्य सेवांच्या उत्तरदायित्वासाठी
लोकाधारित देखरेख संकल्पना

मोडयुल 3-लोकशाहीचे घटक व
लोकसहभागातून आरोग्यसेवांचे नियोजन


मोडयुल 4-खाजगी आरोग्यसेवांवर
नियंत्रणाची गरज


 

अशी घ्या आपल्या बाळाची काळजी

चांगल्या व आरोग्यदायी वाढीसाठी आपण हे करूया

पोषण हक्क गट कार्यकर्ता डायरी


एकात्मिक बाल विकास सेवांवर लोकाधारित देखरेख व कृती प्रक्रिया- संदेश कार्ड


एकात्मिक बाल विकास सेवांवर लोकाधारित देखरेख व कृती प्रक्रिया मार्गदर्शिका पुस्तिका

6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुलांच्या पोषणाबद्दल समुदायाला संदेश देण्यासाठी कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण पुस्तिका

 

रुग्ण कल्याण समिती निधी खर्चाची माहिती असलेले पोस्टर – धडगाव (ग्रामीण रुग्णालय, नंदुरबार), कशेळे (ग्रामीण रुग्णालय, रायगड), आंबिवली (प्राथमिक आरोग्य केंद्र, रायगड)


         

Quarterly Anganwadi Tool

Quarterly Tool Group discussion Anganwadi services

Yearly tool Anganwadi

RKS Budget Allocation Prospectus for Amravati


RKS Budget Allocation Prospectus for Nandurbar


RKS Budget Allocation Prospectus for Pune


सरकारी दवाखान्याचा कारभार आवश्यक औषधांविना सुरूच...

देखरेख करूया औषधांच्या खरेदी-वितरण प्रक्रियेवर आणि उपलब्धतेवर...

सरकारी आरोग्य केंद्रांतील औषधांच्या कमतरतेची समस्या सर्वश्रुत आहे. औषधांची समस्या सोडविण्याकरिता त्या त्या आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता कशी आहे याबाबत माहिती गोळा करून लोकाधारित देखरेख प्रक्रियेमार्फत घेण्यात येणाऱ्या जनसुनवाईच्या माध्यमातून तसेच वेगवेगळया पातळयांवर देखरेख व नियोजन समित्यांमध्ये तसेच राज्यस्तरीयकार्यशाळा व बैठकांमध्ये हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. प्रसारमाध्यमांनीही हा प्रश्न उचलून धरला. या सगळयांमुळे औषधांची समस्या सरकारपर्यंत पोहचविण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी औषधांची समस्या काही सुटलेली नाही. औषधांच्या समस्येचा खोलात जाऊन विचार केला असता, या समस्येचे मूळ औषध खरेदी वितरण पध्दतीत असल्याचे लक्षात येते. मार्च 2009 ते जुलै 2011 या कालावधीत औषधांची उपलब्धता, खरेदी वितरण व्यवस्था व बजेट यावर 'साथी'मधून एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातूनही लक्षात आले की सरकारी आरोग्य केंद्रांतील औषध तुटवडयाच्या प्रश्नाला अनेक पदर असून औषध खरेदी-वितरण पध्दतीतील अनेक दोष हे यामागील एक महत्त्वाचे कारण आहे.

म्हणजेच औषधांची समस्या सोडवायची असेल तर औषधांच्या खरेदी-वितरण प्रक्रियेत सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण औषधांच्या खरेदी-वितरण पध्दतीतील दोषांमुळे जर आरोग्य केंद्रात पुरेशी औषधेच पुरविली गेली नाहीत तर रुग्णांना ती मिळणार तरी कशी? म्हणूनच औषधांचा मुद्दा जर ठळकपणे मांडायचा असेल तर केवळ आरोग्य केंद्रात औषधांचा साठा किती आहे, कोणती औषधं उपलब्ध आहेत, एवढीच माहिती गोळा करून भागणार नाही तर औषधांच्या उपलब्धतेविषयी अधिक तपशिलात जाऊन माहिती गोळा करावयास हवी तसेच औषधांची उपलब्धता पाहण्यासोबतच औषधांच्या खरेदी व वितरण प्रक्रियेवरही देखरेख ठेवणे आवश्यक आहे.

या सगळया पार्श्वभूमीवर वरील अभ्यासाचा एक भाग म्हणून औषध खरेदी व वितरण प्रक्रियेसंदर्भात तपशीलवार माहिती गोळा करण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली आहे. या प्रश्नावलीच्या आधारे आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा व स्थानिक पातळीवरून कशा प्रकारे औषध खरेदी-वितरण केली जाते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्धतेची स्थिती कशी आहे या बद्दल माहिती गोळा करता येईल व या माहितीच्या आधारे सरकारी दवाखान्यातील औषध तुटवडयाच्या प्रश्नाला वाचा फोडून औषध तुटवडा कमी करण्यासाठी सरकारला योग्य पर्याय सुचविण्यामध्ये पुढाकार घेता येईल.

8.5 x 11, पृष्ठ संख्या - 24, प्रकाशन-2012

"आशा"साठी पूरक प्रशिक्षण पुस्तिका - 1

या चित्रमय पुस्तकामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आशा प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा, आशाची कामे हे आशाच्या कामासंदर्भातील विषय मांडले आहेत. आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करण्यासाठी आरोग्य या विषयाची माहिती व्हावी हा या पहिल्या पुस्तकाचा हेतू आहे. आपण निरोगी कसे राहू शकतो; आपली स्वच्छता; अन्न-पाण्याची स्वच्छता; कचरा, मैला, सांडपाण्याचा बंदोबस्त; आपले आरोग्य आपल्या आहारावर अवलंबून असते, आपल्या शरीराची रचना अशी सुरुवातीची काही प्रकरणे आहेत. या शिवाय ग्रामीण व आदिवासी भागात सरकारमार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध योजना, स्त्री आरोग्य विषयाची तोंड ओळख, काही मूलभूत आजार उदा. जुलाब, अंगदुखी, सर्पदंश इ. माहिती या पुस्तकात दिली आहे. सरते शेवटी परिशिष्ट म्हणून औषधाचा तक्ता दिला आहे.

8.5'' x 11'', पृष्ठ संख्या - Rs. 204/-, तीन रंगी छपाई, प्रकाशन-2008

 

"आशा"साठी पूरक प्रशिक्षण पुस्तिका - 2

या चित्रमय पुस्तिकेमध्ये मासिकपाळी व प्रजनन, गरोदरपणातील काळजी, बाळंतपण, असुरक्षित गर्भपात व वैद्यकीय गर्भपात, त्यानंतर लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी, या स्त्री आरोग्याशी संबंधित विषय मांडले आहेत. याशिवाय नवजात बाळाची काळजी, लसीकरण, बाळांना होणारे श्वसनाचे आजार, बाळाचा आहार या लहान मुलांशी संबंधित विषयांवरील प्रकरणे यात दिली आहे. याशिवाय आपल्या नेहमीच्या ताप या आजाराची माहिती त्याची कारणे, त्याचे निदान, उपचार व प्रतिबंधन याबाबतची शास्त्रीय माहिती या पुस्तकात दिली आहे. या प्रत्येक विषयानंतर आशाने करायची कामे किंवा तिच्या जबाबदाऱ्या याची थोडक्यात माहिती दिली आहे.

8.5' x 11', पृष्ठ संख्या - Rs. 204/-, तीन रंगी छपाई

 

 

"आशा"साठी पूरक प्रशिक्षण पुस्तिका - 3

या चित्रमय पुस्तिकेमध्ये विविध आजार, स्त्री-आरोग्याची माहिती याची मुद्देसुद मांडणी केली आहे. नको असलेलं गरोदरपणं टाळण्यासाठी (गर्भनिरोधके), जनन संस्थेचे आणि लिंगसांसर्गिक आजार, एच्.आय.व्ही./एडस्, किशोयवय- तारुण्याकडे वाटचाल, मासिकपाळीच्या वेळी घ्यायची काळजी ही प्रकरणे या पुस्तकात दिली आहेत. तुम्हाला थकवा का येतो?' व 'स्त्री संवेदनशील आरोग्यसेवा हवी!' एकूण समाजातील स्त्रियांविषयीची संवेदनशील भूमिका देणारी ही दोन पोस्टर्स या पुस्तकात सरतेशेवटी दिली आहेत.

8.5' x 11', पृष्ठ संख्या - Rs. 204/-, तीन रंगी छपाई, प्रकाशन- 2008

 

 

"आशा"साठी पूरक प्रशिक्षण पुस्तिका - 4

या पुस्तकाचा विषय जरा वेगळा आहे. आशा एक गाव आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करताना तिच्या अंगी कोणती कौशल्ये व गुण असायला हवे, स्त्री-पुरुष समानता, मानवी हक्क, इ. मूल्यांचा आदर करून आशा म्हणून कसे काम करता येईल? आशा म्हणून गावात काम करण्यामध्ये स्वत:चा आत्मविश्वास, गावातील लोकांचे सहकार्य घेऊन आरोग्याचे काम कसे करावे याची गोष्टींरूप माहिती या पुस्तकात दिली आहे. एक आदर्श कार्यकर्ती म्हणून आशाने गावात आत्मविश्वासाने उभे राहावे यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल असा विश्वास वाटतो.

8.5' x 11', पृष्ठ संख्या - Rs. 204/-, तीन रंगी छपाई, प्रकाशन-2010

 

 

"आशा"साठी पूरक प्रशिक्षण पुस्तिका - 5

या पुस्तकाचा विषय जरा वेगळा आहे. आशा एक गाव आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करताना तिच्या अंगी कोणती कौशल्ये व गुण असायला हवे, स्त्री-पुरुष समानता, मानवी हक्क, इ. मूल्यांचा आदर करून आशा म्हणून कसे काम करता येईल? आशा म्हणून गावात काम करण्यामध्ये स्वत:चा आत्मविश्वास, गावातील लोकांचे सहकार्य घेऊन आरोग्याचे काम कसे करावे याची गोष्टींरूप माहिती या पुस्तकात दिली आहे. एक आदर्श कार्यकर्ती म्हणून आशाने गावात आत्मविश्वासाने उभे राहावे यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल असा विश्वास वाटतो.

8.5' x 11', पृष्ठ संख्या - Rs. 204/-, तीन रंगी छपाई, प्रकाशन-2010

आरोग्यसेवा आपला अधिकार

स्वास्थ की समझ बढ़ाए

स्त्री प्रजनन आरोग्य-पोस्टर

वाटचाल आरोग्य अधिकाराची

 

खून की कमी (एनिमिया)

अनिमिया (रक्तपांढरी)

 
 
 

 

"आशा" प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शिका

 आशांचे प्रशिक्षण करण्यासाठी प्रशिक्षकांसाठी ही मार्गदर्शिका आहे. 'आशा पूरक प्रशिक्षण पुस्तिका' या पाच चित्ररूप प्रशिक्षण पुस्तिकांच्या आधारे आशांचे प्रशिक्षण करणाऱ्या प्रशिक्षकांसाठी ठोस मार्गदर्शन या मार्गदर्शिकेमध्ये आहे. शाळेतील मुलांना शिकवणे व 'आशां'ना शिकवणे यात काय महत्त्वाचा फरक आहे; प्रशिक्षण व शिक्षण यात काय फरक आहे; या प्रशिक्षणासाठी तयारी काय करावी; सुरुवात कशी करावी; कोणते बारकावे, पथ्ये लक्षात ठेवावी; प्रशिक्षणार्थी स्त्रियांचा आत्मविश्वास कसा जागृत करावा; त्यांच्यात प्रशिक्षणाबद्दल आवड कशी निर्माण होईल अशा 'आशा'च्या प्रशिक्षणाच्या सर्व पैलूंबाबत या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे.

धडयाची 'प्रशिक्षण उद्दिष्टे' कोणती हे प्रत्येक धडयाच्या सुरुवातीला मांडून ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्या त्या धडयाबाबतच्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले आहे. असे करतांना संबंधित विषयाबाबत गरज असेल तिथे काही शास्त्रीय माहिती दिली आहे व जागोजाग वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना दिली आहे. ही मार्गदर्शिका आशा प्रशिक्षकांना आवडावी; बहुमोल ठरावी अशी आशा आहे.

8.5 x 11 पृष्ठ संख्या - 208, प्रकाशन-2011, देणगी मूल्य- Rs. 200/-

 

 

 

 
 

  Next Page >>

 

Anusandhan Trust

Anusandhan Trust, a public trust registered under the Bombay Public Trust Act, 1950, (Registration No: E-13480), runs two centres namely: CEHAT based in Mumbai and SATHI in Pune.
read more...

Media Gallery